Breaking News

दिंद्रुड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अजय कोमटवार तर उपसरपंच पद रिक्त

दिंद्रुड : दिंद्रुड ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जमाती साठी आरक्षित जागा राखीव असल्याने अजय कोमटवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.तर उपसरपंच पदासाठी दिलीप कोमटवार यांच्या एकाच पॅनल मधील सहा अर्ज दाखल करण्यात आले असल्याने थोडा वेळ उपसरपंच पदासाठी संभ्रम निर्माण झाला.

  मात्र सर्व सदस्यांची बैठक घेत उपसरपंच पद रिक्त ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेत उपसरपंच पदाचा पेच सोडवण्यात पॅनलप्रमुख दिलीप कोमटवार यांना यश आले. ग्रामपंचायत निवडणूक २०२१ च्या दिंद्रुड ग्रामपंचायत सरपंच पदी अजय कोमटवार यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. निवडणूक अधिकारी पदी माजलगाव तालुका कृषी अधिकारी सुहास हजारे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक नवनाथ पवार यांनी सहकार्य केले.
No comments