Breaking News

केजमध्ये २०० दारूच्या बाटल्यासह स्कुटी ताब्यात


अवैध चोरट्या दारू वाहतुकीवर केज पोलीसांची नजर

गौतम बचुटे । केज 

केज पोलीसांनी आता आपला मोर्चा अवैद्य व चोरट्या दारू वाहतुकीकडे वळविला असून केज येथे चोरटी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून देशी दारूच्या २०० बॉटल्स व स्कुटी ताब्यात घेतली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २७ फेब्रुवारी शनिवार रोजी केज पोलीसांना गुप्त खबऱ्या गुप्त मााहिती मिळाली की, एक इसम हा त्याच्या स्कुटी वरून देशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार ही माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना कळविली त्या नुसार पोळीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांच्या पथकाने जुन्या सरकारी दवखान्या जवळ सापळा लावला असता अजय मस्के हा स्कुटी क्र (एमएच-४४/एक्स-२६९८) वरून पांढऱ्या रंगाच्या पोत्यात दोन खाकी रंगाचे खोकी घेऊन जात असल्याचे आढळून आले. 

पोलिसांनी त्याला अडवून झडती घेतली असता त्या खोक्यात देशी दारूच्या टॅगो पंचच्या १०० आणि जी एस डॉक्टरच्या १०० बाटल्या असा २ हजार ६०० रु चा माल व ६० हजार रु. स्कुटी असा एकूण ६३ हजार ६०० रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी भाग घेतला. पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका व्यक्तीला दोनशे बाटल्या विकतातच कसे ? :- एकेका व्यक्तीला दोनशे दारूच्या बाटल्या विक्री कशी काय होते. या बाबत दारू बंदी विभाग काय झोपा काढत आहे काय? अशी चर्चा सुरु आहे. 

No comments