Breaking News

लोकहिताच्या नेतृत्वावर लांच्छन लावण्यापेक्षा ज्याने- त्याने आपल्या बुडाखालचा अंधार तपासावा

आ. संदीप क्षीरसागर समर्थक अजय सुरवसे यांचा विरोधकांना कडक शब्दात खडे बोल सुनावले

बीड :  जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व बीड मतदार संघाचे आ. संदीप क्षीरसागर हे लोकहिताचे कामे करीत असून आजवर सत्तेचा दुरुपयोग करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विकास योजना फस्त केल्यात. मात्र ना. धनंजय मुंडे आणि आ. संदीप क्षीरसागर यांनी या भ्रष्ट कारभाराला ब्रेक लावला आहे. त्यामुळं पोटात गोळा उठलेल्या विरोधकांनी लोकहिताच्या या दोन्ही नेतृत्वावर लांच्छन लावण्यापेक्षा ज्याने-  त्याने आपल्या बुडाखाली अंधार तपासावा अशा कडक शब्दात आ. संदीप क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक अजय सुरवसे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की विकास ध्येय बाळगून संघर्ष वाट्याला आलेल्या बीड जिल्ह्यातील लोकाभिमुख नेतृत्व असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व  आ. संदीप क्षीरसागर यांनी कधी विकासासाठी तडजोड न करता लोकविकास साधण्यासाठी कायम प्रयत्नरत आहेत. त्यामुळेच नागरिकांनी  या संघर्ष योध्यावर विश्वास टाकून त्यांना लोकनेतृत्व बहाल केलं आहे.
आजवर ज्यांनी जिल्ह्याचा परिणामी शहराच्या विकासाठी आलेल्या विकास निधी म्हणजे आपली बापज्याद्याची धनदौलत म्हणून लुटण्याचा प्रयत्न चालविला होता. लोकहिताच्या नेतृत्वामुळे त्या लुटारूंचे मात्र धाब्बे दणाणले आहेत. "राम नाम जपणा...."  ही नीती बाळगून लुटारूंच्या टोळीतील काही पोपटपंची यांनी विश्वास संपादन करून आलेल्यांना ही दाणापाणी मिळत नसल्याने विकसनशील नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी  षड्यंत्र करू पाहत आहेत. स्वप्नाचे रंजक महाल उभारून ना. धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांच्यावर शिंतोडे मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. बीड शहराच्या विकासाठी भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढून आ. संदीपभैय्यांनी आपल्या काकांविरोधात बंड पुकारले; हे जगजाहीर आहे. मात्र कल्पनेच्या विश्वात वावरणारे आणि स्वप्नांचा महाल बांधण्याचा चंग बाधणारांचे मनसुभे संघर्ष योध्यामुळे उधळले जाऊ लागली आहेत. त्यामुळे लुटारूंचा सरदार आणि त्याच्या पिल्लावाळीच्या पोटात गोळा उठला असल्याचे आ. संदीपभैय्यांचे कट्टर समर्थक अजय सुरवसे म्हणाले असून लोकहिताच्या या दोन्ही नेतृत्वावर लांच्छन लावण्यापेक्षा ज्याने-  त्याने आपल्या बुडाखाली अंधार तपासावा आशा कडक शब्दात खडे बोल सुनावलेत.
No comments