Breaking News

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सामान्य कर्मचाऱ्यांचा होणारा छळ चिंताजनक - सुरेश पाटोळे

बीड : विविध प्रशासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा होणारा छळ आणि त्यांचे केले जाणारे अपमान अत्यंत चिंता जनक आहेत; किंबहूना ही बाब दखल घेण्याजोगी असून यासंदर्भातल्या तक्रारी दबक्या आवाजात ऐकायला मिळतात; दरम्यान, असे होऊ नये अन्यथा यासंदर्भात आवाज उठवला जाईल... असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी दिला आहे.


यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे म्हणाले, विशेषत: महाराष्ट्र राज्याच्या बीड जिल्ह्यामधील विविध तालुके आणि बीड शहरामध्ये विविध प्रशासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांतर्गत विविध कर्मचारी कार्यरत असतात; परंतु काही कार्यालयांमध्ये आपल्या पदाचा मोठेपणा आणि घमेंड करून काही उच्च वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आणि कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध  क्लास3, क्लास फोर आदीसह सर्वसामान्य कर्मचाऱ्यावर आपल्या पदाच्या अहमगंडाने पछाडून त्रास आणि दबाव आणत असल्याच्या घटना दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील तरतुदीनुसार सर्वांचा आदर अपेक्षित आहे. समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही भारतीय घटनेने जगाला दिलेली देणगी आहे. ही बाब लक्षात घेता एकता अखंडता आणि सर्वांगीण प्रगती साधण्याच्या दृष्टीने अधिकार्‍यांनी सर्वसामान्य कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल, अशी आदराची भावना देत कार्य करून घेणे अपेक्षित आहे. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे.

एकूणच,वरिष्ठांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांवर अन्याय न करता समतेची वागणूक देऊन आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास साधावा, अशी अपेक्षाही सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी यासंदर्भात केले आहे.


No comments