Breaking News

पात्रुडमध्ये राष्ट्रवादी हेल्थ क्लबचे आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते उद्घाटन

डाँ.वसिम मनसबदार यांनी स्वखर्चातून उभारली हेल्थ क्लब 

माजलगाव :  येथील पंचायत समितीचे उपसभापती डॉ. वसीम मनसबदार यांनी पात्रुड पंचायत समितीच्या निवडणुकीत   येथील तरुणांना मोफत जिम्स उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते,त्याची पुर्तता दि ०९ फेब्रुवारी मंगळवार रोजी स्वखर्चातुन उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादी जिम्स क्लबचे उद्घाटन आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प.चे सभापती जयसिंह सोळंके, जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती लतिफभाई मोमीन,पात्रुडचे सरपंच अँड कजिम मनसबदार यांची प्रमुख उपस्थिती होती,पंचायत समितीचे सभापती डॉ. वसिम मनसबदार हे तरूणाच्या गळ्यातील ताईद बनलेले असून ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात सामाजिक कार्याचाच भाग म्हणून पात्रुड येथील युवकासांठी स्वखर्चाने हेल्थ क्लब उभारली असुन सदर जिम्स हि पुर्णपणे मोफत निशुल्क असल्याचे डाँ.मनसबदार यांनी यावेळी संगितले. या कार्यक्रमासाठी शेख सद्दाम, शेख माजेद, शेख युनूस, शेख नवेद, जूबेर सौदागर, वसिम शेख, नजीर शेख यांनी परिश्रम घेतले.

No comments