Breaking News

दुर्लक्ष ! चौथा दिवस : त्या बापलेकाच्या उपोषणाकडे बीड जिल्हा प्रशासनाचे डोळेझाक..

उपजिल्हाधिकारी आघाव पाटलांच्या मनमानीला जिल्हा प्रशासनाचा अघोषित पाठींबा ; उपोषणकर्त्यांचा आरोप

बीड :  भुसुधारचे उप जिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील दलित समाजातील शेतकरी लालासाहेब निकाळजे आपल्या वडिलांसह तीन दिवासांपासून  न्यायासाठी जिल्हाधिकारी यांच्या उंबरठयावर उपोशासाठीकडे  जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत असून उपोषणाचा आज चौथ्या दिवस असताना उपजिल्हाधिकारी आघाव पाटलांच्या मनमानिला जिल्हा प्रशासनाचा अघोषित पाठींबा आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपोषणकर्त्यांसह बहुजन समाजातील संघटनाकडून उपस्थित केला आहे.

बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील सर्वे नंबर १६९ व १७० मधील शेत जमिनीवर दलित समाजातील दगडू निकाळजे व इतरांचे कुळ कायद्यानुसार मालकी हक्क आहे. हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० च्या  कलम ९२ मधील कायद्यात तरतूद नसतानाही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांनी कुळन्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजीच्या आदेशास अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या अपिलात एक वर्षापूर्वी म्हणजे ३ जानेवारी २०१९ रोजी टाईम ट्राईव्हल करून स्थगिती आदेश दिला. स्वप्नात झिंगलेल्या उपजिल्हाधिकारी भुसुधार आघाव पाटील यांनी टाईम ट्राईव्हल करून दिलेला आदेश रद्द करण्यात यावा. तसेच प्रलंबित असलेले अपील गुणवत्तेवर निकाली काढण्यात यावे. या मागणीसाठी अन्याग्रस्त शेतकरी दगडू निकाळजे व त्यांचा मुलगा लालासाहेब निकाळजे हे बाप लेक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत.

मात्र त्याकडे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप दुर्लक्ष करीत असून उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांनी हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० च्या  कलम ९२ मधील कायद्यात तरतूद नसतानाही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कुळन्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या आदेशाला व कुळवहिवाट कायद्याला हरताळ फासला आहे. कायद्याला  पायदळी तुडवून  आपला मनमानी करभार हकणाऱ्या दलित समाजाच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांच्या  मनमनीला जिल्हा प्रशासनाचा अघोषित पाठींबा दिला आहे, का? असा सवाल यानिमित्ताने बहुजन समाजातील संघटनातून उपस्थित केला जात आहे.





No comments