Breaking News

शेतकऱ्याची ऑनलाइन फसवणूक : तब्बल सात महिन्या नंतर केज पोलिसात गुन्हा दाखल


गौतम बचुटे । केज 

मोबाईल सिम कार्ड बंद करण्यात येणार असल्याची बतावणी मारून  एक लिंक उघडण्यास सांगून एका शेतकऱ्याचे २१ हजार रुपये परस्पर ऑनलाइन पध्दतीने खात्यातून काढून घेतल्या प्रकरणी तब्बल सात महिन्या नंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील उमरी येथील राजाभाऊ नामदेव सावंत यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला आणि सांगितले की, तुमचे एअरटेल कंपनी कडून बोलत असून तुमचे मोबाईलचे सिम कार्ड बंद करण्यात येणार आहे. जर ते सुरू ठेवायचे असेल तर आम्ही एक लिंक पाठवू ती ओपन करा. त्या प्रमाणे राजाभाऊ सावंत यांनी करताच त्यांच्या नावे कळंब रोडच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत शेतीचे जमा असलेले अनुदान एकदा ५ हजार रु. व १६ हजार ४०० रु. असे एकूण २१ हजार ४०० रु हे परस्पर काढून घेतले. सदर घटना ही मागील वर्षीच्या जून महिन्यात घडली होती. या प्रकरणी राजाभाऊ सावंत यांनी दि. १२ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड येथील सायबर सेलकडे तक्रार दिल्या नंतर  केज पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या पत्रानुसार दि.१० फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments