Breaking News

मोहखेड शिवारात लांडग्याचा धुमाकूळ : पाच शेळ्यांचा पाडला फारशा

दिंद्रुड : - धारूर तालुक्यातील मोहखेड शिवारात लांडग्याचा धुमाकूळ घालत ५ शेळ्यांवर हल्ला चढवत फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

मोहखेड शिवारातील  शेतकरी सुरेश गोपीनाथ सोळंके हे घरी जेवण्यासाठी गेले असता यांच्या माळावरील शेतात गट नंबर 357 या ठिकाणी 4 लांडग्यांनी ५ शेळ्यांचा फडशा पाडला तर दोन शेळ्या जखमी केल्या असुन या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.वनविभागाच्या कर्मचार्यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.या घटनेनंतर मोहखेड शिवारात पशु मालकांत घबराट पसरली आसुन लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागा कडे मागणी होत आहे.

No comments