Breaking News

व्हरकटवाडी ग्रामस्थांनी केला ग्रामसेवकाचा सत्कार

    तेलगाव :   व्हरकटवाडी येथील ग्राम पंचायतचे ग्रामसेवक अमोल कोकाटे बीड जि.प.चा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा व्हरकटवाडी ग्रामस्थांनी नुकताच सत्कार केला. 

          धारूर तालुक्यातील व्हरकटवाडी ग्राम पंचायतचे ग्रामसेवक अमोल कोकाटे यांनी सरपंच प्रतिनिधी राम व्हरकटे ,उपसरपंच भानुदास राठोड यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन, गावच्या विकासासाठी प्रयत्न करत उत्कृष्ट कार्य केले. तसेच त्यांच्याच कार्यकाळात या ग्राम पंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार, राष्ट्रसंत गाडगे बाबा अभियानातील ग्राम स्वच्छता पुरस्कार, पाणी फाउंडेशनचा पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार गावाला मिळाले .त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन बीड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा नुकताच गौरव केला. त्यामुळे गुरूवारी व्हरकटवाडी ग्रामस्थांनी एका छोटेखानी कार्यक्रमात ग्रामसेवक अमोल कोकाटे यांचा गावच्या वतीने ह्रदयसत्कार केला.यावेळी सरपंच, उपसरपंच भानुदास राठोड, राम व्हरकटे आदिसह गावकरी उपस्थित होते.

No comments