Breaking News

छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत हे दुर्देव ; किशोर पिंगळे यांची जयंतीबाबतच्या नियमावलीवर जोरदार टीका


 बीड :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ 100 जणांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, आजघडीला राज्यात राजकीय मेळावे, नेत्यांचे वाढदिवस, आंदोलने मोर्चे सर्रासपणे सुरु आहेत. त्यावेळी कोरोनचा संसर्ग होत नाही का शिवजयंतीवरच निबर्ंध कशामुळे असा सवाल राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी उपस्थित केला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत हे दुर्देव आहे. शिवजयंतीबाबतच्या सर्व नियमावली रद्द कराव्यात अशी मागणी त्यांनी पत्रकान्वये केली आहे.

महाराष्ट्रात काही पक्षांचे नेते सर्रासपर्ण राजकीय मेळावे घेत आहे तर आंदोलने मोर्चे मोठ्या संख्येने होत आहेत. अशा वेळी कोरोना संसर्ग व सोशल डिस्टनसींगचा फज्जा उडतो. राज्य शासन त्यावर काहीच बोलत नाही, कारवाई करत नाही मात्र आता शिवजयंती साजरी करण्यापूर्वीच नियमावली जाहीर करत आहे. ही दुटप्पी भुमिका नाही काय असा सवालही पिंगळे यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारने शिवजयंती संदर्भातील निर्बंध बललले नाही तरी समाजबांधव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नेहमी प्रमाणे जल्लोषात साजरा करतील अशा विश्वास व्यक्त केला आहे. जयंती साजरी करताना मराठा बाधंवांनी सोशल डिस्टनसींगचे कोटेकोर पालन करावे असे आवाहन राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पिंगळे यांनी केले आहे.

No comments