Breaking News

स्टंटबाजी करुन पटकन मोठं होण्याचा गोड गैरसमज ..! सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांची आ.पडळकरांवर खोचक टीका


जेजुरी येथील पुण्यश्लोक आहिलबाई होळकर  यांच्या पुतळा अनवरावरून घडलेला प्रकार निंदणीय -  आखाडे बीड : 
जेजुरी येथील भाजपा आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी घडविलेला प्रकार निंदणीय व स्टंटबाजीचा असून ठोस स्वरूपाचे काहीएक कार्य न करता कमी काळात केवळ स्टंटबाजी करून पटकन मोठे होता येते असा गोड गैरसमज स्टंटबाजांचा असतो अशी खोचक प्रतिक्रिया सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

         जेजुरी येथे घडलेला प्रकार पाहाता कायदेमंडळातील व्यक्तीच जर कायदा हातात घेऊन कायदेभंग करणार असेल तर ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. कोणत्याही क्षेत्रात मोठेपणा मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ कठोर मेहनत करावी लागते परंतु काहींना स्टंटबाजी हा शॉर्टकट व सोपा मार्ग वाटू लागला आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उठसुठ खा. शरद पवार यांना विनाकारण टार्गेट करायचे बेताल बोलून गरळ ओकायची हि पडळकर यांची पद्धत यापुढे खपवून घेतली जाणार नाही. पडळकर यांना शरद पवार यांची बरोबरीच करावीशी वाटत असेल तर एखादे तोडीस तोड लोकोपयोगी विधायक कार्य करून करावी. पडळकर तोडीचे तर सोडा पण पासांगाएव्हढे देखील कदापीही शक्य होणार नाही. पडळकरांच्या उतावळेपणा,नौटंकी व स्टंटबाजीला राज्यातील जनतेने पुरते ओळखून सोडले आहे असेही पत्रकात कल्याण आखाडे यांनी म्हटले आहे.

No comments