Breaking News

शिवसेना मोदी सरकारच्या विरुद्ध उतरली रस्त्यावर

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरुद्ध बैलगाडीवर मोटार सायकल आणि सिलेंडर ठेवून आंदोलन

गौतम बचुटे । केज  

केंद्र सरकारच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरली असून केज येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळुक, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली इंधन दरवाढीच्या विरुद्ध रस्त्यावर येऊन आंदोलन केले.

या बाबतची माहिती अशी की, दि.५ फेब्रुवारी शुक्रवार रोजी केज येथे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना नेते चंन्द्रकांतजी खैरे साहेब व संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्या सूचने वरून जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळूक, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, महिला आघाडीच्या सौ. रत्नमालाताई मुंडे, गिरीश देधपांडे, शहरप्रमुख अनिल बडे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवाजी चौकातील पक्ष कार्यालया पासून भगवे झेंडे, फलक आणि प्रचंड घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करणारे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. तसेच मोर्चात बैलगाडीवर एक मोटार सायकल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे रिकामे सिलेंडर ठेवले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचताच प्रचंड निदर्शने आणि घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला. 

मोर्चात सहसंघटक योगेश नवले, शहर प्रमुख अनिल बडे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, नसिरुद्दीन इनामदार, अशोक जाधव, अभिजीत भालेकर, महाराणा घोळके, अभिजीत घाटुळ, डोईफोडेताई,  विकास काशीद, पप्पू ढगे, रामहरी कोल्हे, आश्रफ शेख, ज्ञानेश्वर शेळके, ज्ञानेश्वर बोबडे, अविनाश करपे, आतम घाडगे, ज्योतिकांत कळसकर, सागर जाधव, राम जाधव, शिवाजी नाईकवाडे, विजय सोळुंके, मधुकर अंधारे, माणिक जावळे, सखाराम वायबसे, हरिश गित्ते, शेकडो शिवसैनिक व शेतकरी बांधव या आंदोलनाला उपस्थित होते.

बैलगाडीवर मोटारसायकल आणि गॅस सिलेंडर ठेवून केला दरवाढीचा निषेध या वेळी आंदोलकांनी बैलगाडीवर मोटारसायकल आणि गॅस सिलेंडर ठेवून पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडर लक्ष वेधून घेत होते.


No comments