नव्या कृषी कायद्याविरोधात आज राहुल गांधींची वायनाडमध्ये ट्रॅक्टर रॅली
वायनाड : शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आज वायनाड लोकसभा मतदार संघात आज ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. त्याचबरोबर आजअनेक योजनांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. ट्रॅक्टर रॅलीनंतर ते शेतकरी आंदोलनाला संबोधीत करणार आहेत.
राहुल गांधी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान वायनाड येथील मंदाद रेल्वे स्थानकापर्यंत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्याअगोदर राहुल गांधी सकाळी 9 वाजता वायनाड येथील इनफंट जीजस शाळेत विद्या वाहिनी बससेवेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यानंतर 11 वाजता वायनाड मधील जोसेफ शाळेतील महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी आणि जवानांच्या फायद्याचा नसून केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. सरकारचा अर्थसंकल्प हा सामान्य भारतीयांचा नसून केवळ एक टक्के लोकसंख्येसाठीचा अर्थसंकल्प असल्याची टीकाही त्यांनी केलीय. राहुल गांधी यांनी सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. काही उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
No comments