Breaking News

माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी जाहिर


भाजपाच्या-२,राष्ट्रवादी काँग्रेस-१,कम्युनिस्ट पक्ष-१ तर सम्रीश्र-१

माजलगाव : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडी दि १७ फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी २:०० वाजता जाहिर झाल्या असुन यामध्ये भाजपाच्या ताब्यात ०२ ग्रामपंचायती तर राष्ट्रवादी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात प्रत्येकी एक ग्रामपंचायत आली असुन एक ग्रामपंचायत समिश्र आहे.

माजलगाव तालुक्यातील राजकीय दुष्टया सर्वात महत्वाच्या असलेल्या मोगरा,गंगामसला,नित्रुड,दिंद्रुड व चोपणवाडी या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दि १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती, त्या पाचही ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी दि १५ फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी २:०० वाजता पार पडल्या यामध्ये दिंद्रुड व गंगामसला ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्या असुन नित्रुड ग्रामपंचायत कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात आली आहे, मोगरा ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली आहे, तर चोपणवाडी ग्रामपंचायतीची गावपातळीवर बिनविरोध निवड झाल्याने हि ग्रामपंचायत कोणत्याही पक्षाच्या ताब्यात नसुन सम्रीश्र आहे.

सरपंच व उपसरपंच पदी यांच्या झाल्या निवडी

मोगरा ग्रामपंचायत ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सरपंचपदी शामराव काळु राठोड तर उपसरपंच पदी तुकाराम सर्जेराव भोजने यांची बिनविरोध निवड, गंगामसला ग्रामपंचायत ( भाजप ) सरपंचपदी सौ.सिमा भालचंद्र सोळंके,तर उपसरपंच पदी अभिजीत रंजित सोळंके यांची निवड,दिंद्रुड ग्रामपंचायत ( भाजप ) सरपंचपदी अजय दिलीपराव कोमटवार यांची निवड तर उपसरपंच पद रिक्त ,नित्रुड ग्रामपंचायत ( कम्युनिस्ट पक्ष ) सरपंचपदी काँ.दत्ता डाके,तर उपसरपंचपदी उत्तमराव जाधव यांची निवड, तर चोपणवाडी ग्रामपंचायती निवडणूक गावपातळीवर बिनविरोध झाल्याने हि ग्रामपंचायत समिश्र असुन सरपंचपदी सौ.सोनाली विलास बडे  तर उपसरपंचपदी मोहन श्रीराम वनवे यांची  निवड करण्यात आली आहे.

No comments