Breaking News

पिंपळनेरमध्ये शिवजयंती उत्साहात

पिंपळनेर  : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रवारी रोजी सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली.


 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच राजाभाऊ गवळी तर प्रमुख पाहूणे म्हणून सरपंच भारत जवळकर, संजय नरवडे, रमेश जाधव सह आदी उपस्थित होते, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करुन दिली. या कार्यक्रमास राहूल गणगे, भारत ढेगे, सुदर्शन कुंभार, राम जाधव, भागवत कदम, गणेश नरवडे, गणेश इंगोले, उमेश जाधव, देवीदास भोसले, आदीनाथ गवळी, बालू पवार, दीपक शिंदे सह वाचनालयातील कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments