Breaking News

सावता परिषद विजयसिंह पंडित यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार-मयुर वैद्य


सावता परिषदेच्या नुतन कार्यकारीणीचा विजयसिंह पंडितांनी केला सत्कार

गेवराई ः- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विजयसिंह पंडित यांनी दर्जेदार विकासाची कामे आणि पारदर्शक कारभार करून जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अध्यक्षपदाचा नवा आदर्श निर्माण केला. विधानसभेत मात्र त्यांचा निसटता पराभव झाला ही मोठी खंत असून विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या दुरुस्त करून येणार्या काळामध्ये विजयसिंह पंडित यांच्या पाठिशी सावता परिषदेची मोठी ताकद उभी करू असे प्रतिपादन सावता परिषदेचे प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी केले. गेवराई येथे सावता परिषदेच्या नुतन तालुका कार्यकारीणीच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

सावता परिषदेच्या नुतन तालुका कार्यकारीणीचा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत गेवराई येथे आज बुधवार, दि.१६ फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावता परिषदेचे महासचिव मयुर वैद्य, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे पाटील, पं.स.सदस्य लक्ष्मण देवकर, नगरसेवक शाम येवले, दादासाहेब घोडके, नवनाथ चौधरी, पंडितराव खेत्रे, सावता परिषदेचे  जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, सावता परिषदेचे प्रवक्ता राजीव काळे यांच्यासह सुधीर फुलझळके, प्रभाकर कुरूंद, भागवत चौधरी, सुनिल चंदे, नितीन शिंदे, महादेव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, तालुका उपाध्यक्ष अश्‍विन जवंजाळ, हनुमंत गायकवाड, बंडू यादव, संदिप दिलवाले, तालुका संघटक गोकुळ खेत्रे, सोमनाथ काळे, तालुका महासचिव सोमनाथ अंतरकर, तालुका सचिव धनंजय वादे, गेवराई शहराध्यक्ष सदाशिव वादे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष राधेशाम लेंडाळ यांचा विजयसिंह पंडित यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, सावता परिषदेला सर्वपरिने पाठबळ दिले जाईल. माळी समाजाचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण सतत पाठपुरावा करू आणि सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ता राजीव काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष रमेश साखरे यांनी मानले.

No comments