Breaking News

उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड प्रकरणी ए.सी.बी.ने तक्रादार वाळु माफीयावर सुध्दा गुन्हा दाखल करावा - गंगाभिषण थावरे

उपविभागीय अधिकारी व तक्रारदार वाळुमाफीयाच्या संपत्तीची ही चौकशी करावी

माजलगाव :  तालुक्यातील गोदावरी व सिंधफाना नदीतुन अनाधिकृतपणे वाळु उत्खनन करत करोडो रुपायांची वाळु वाळुमाफीयाने उपसा करुन ग्राहकांना अवाच्या सव्वा भावाने विकत करोडो रुपायांची माया गोळा केली आहे, त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना तक्रारदार वाळुमाफीयाने ६५ हाजार रुपायांची लाच हि निव्वळ अनाधिकृत पणे वाळु उत्खनन सुरु करण्यासाठी व त्यांच्या हायवा टिप्पर सुरु ठेवण्यासाठीच दिल्याने तक्रारदार वाळुमाफीयावर ए.सी.बी.ने स्वतः पुढे होऊन गुन्हा दाखल करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष भाई गंगाभिषण थावरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


याबाबत शेतकरी संघर्ष समितीच्या वतिने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात भाई गंगाभिषण थावरे यांनी असे म्हटले आहे की,दि १८ फेब्रुवारी रोजी येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना त्यांच्या चालका मार्फत वाळुच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी यातील तक्रारदार वाळुमाफीयाने ६५ हाजार रुपायांची लाच देतांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील संभाजी चौकात रंगेहाथ पकडले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी व त्यांच्या चालकावर या प्रकरणी गुन्हे दाखल करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक पथक करत असुन ज्या कारणासाठी उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या चालका मार्फत लाच देणाऱ्या तक्रारदार वाळुमाफियांचा हेतु सुध्द नव्हताच,तक्रारदार वाळुमाफीयांच्या अनाधिकृत पणे वाळुच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी लाच देणाऱ्या तक्रारदार वाळुमाफीयांवर सुध्दा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यात यावा,याप्रकरणी तक्रारदार वाळुमाफीयाच्या संपत्तीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतिने भाई गंगाभिषण थावरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
No comments