Breaking News

नवतरुणांना नोकरी सह उद्योग क्षेत्रात सहकार्य करणार - उद्योजक माधवराव निर्मळ


माधवराव निर्मळ यांचा  सह्रदय सत्कार संपन्न

दिंद्रुड : माझ्या भागातील नवतरुणांना नोकरी सह उद्योग धंदे उभारण्यासाठी माझा सदैव ध्यास असणार असल्याचे भाष्य उद्योजक माधवराव निर्मळ यांनी केले. नर्मदा जिनिंग येथे बुधवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. 

   धारूरचे माजी नगराध्यक्ष तथा धनगर समाजाचे धडाडीचे नेतृत्व माधवराव निर्मळ यांना नकताच उद्योग भुषण पुरस्कार मिळाला. त्याबद्दल धनगर समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा समाजाच्या वतीने सह्रदय सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा समाज कल्याण सभापती कल्याणराव आबुज, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब वगरे,भीमराव सातपुते, नवनाथ राव जाडकर,भागवतराव दराडे, शिवाजीराव काळे,अमर डोने, विष्णू देवकते,  चंद्रकांत देवकते, भीमराव सातपुते,अंकुशराव निर्मळ, निळकंठ गडदे,प्रकाशराव जाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रंजीत रुपनर यांनी केले, सुत्रसंचालन शिरिषकुमार रामदासी यांनी केले. या वेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माधवराव निर्मळ यांचे नेतृत्व म्हणजे एक विचार प्रवाह असुन त्यांनी जातीभेद न करता सर्वधर्म समभाव या उक्तीप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन केलेले खरोखरच उल्लेखनिय असुन, त्यांचे कार्य आजच्या तरूण पिढीला निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरोव्दगार उपस्थित मान्यवरांनी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.समाजकल्याण सभापती कल्याणराव आबुज, अमर डोने, विष्णू देवकते,  चंद्रकांत देवकते,भीमराव सातपुते,अंकुशराव निर्मळ, निळकंठ गडदे,प्रकाश राव जाडकर यांनी माधवराव निर्मळ यांच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक कार्यावर प्रकाश टाकत भविष्यात राजकीय दृष्टया सक्षम नेतृत्व म्हणून निर्मळ यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे नमुद केले. रंजीत रुपनर,शंकर चौरे, देवा लोंढे, बाबुराव पांढरे, गणेश बोडके, ज्ञानेश्वर आबुज, अशोक शेंडगे, निलेश गायके, गणेश शेळके, अंगद बडे, सुखदेव मुळे आदींनी या समारंभाचे संयोजन केले होते .

No comments