Breaking News

विजदरवाढीच्या विरोधात भाजपने केज महावितरणच्या कार्यलयाला ठोकले टाळे !

गौतम बचुटे । केज

वीज दरवाढीच्या विरोधात केज येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालया टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले आले.

दि. ५ फेब्रुवारी शुक्रवार रोजी केज येथे भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, तालुका अध्यक्ष भगवान केदार, विष्णू घुले, रमाकांत मुंडे, डॉ. वासुदेव नेहरकर, संदीप पाटील, सुरेंद्र तपसे आणि दत्तात्रय धस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे लावून कार्यालया समोर ठिय्या दिला. आंदोलनात महादेव सूर्यवंशी, अतुल इंगळे, ठोंबरे, संभाजी गायकवाड, शेषेराव कसबे, विक्रम डोइफोडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


No comments