Breaking News

कृषी दुकानदार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे फ़क्त दुकानदारने प्रमाणिक पणा ठेवावा -कल्याण कुलकर्णी


दिंद्रुड : शेतकऱ्यांचा खरा विकास हा कृषी दुकानदारच  करू शकतो तो शेतकऱ्याचा खरा आत्मा  आहे .फक्त कृषी दुकानदाराने शेतकऱ्याला प्रामाणिक सेवा द्यायला पाहिजे असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी दिंद्रुड येथील मैत्री कृषी दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी केले. आज दिंद्रुड येथील राजेभाऊ धुमाळ यांच्या मैत्री कृषी दुकानाचे उद्घाटन दिंद्रुड चे सरपंच अजय कोमटवार ,प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी ,डी सी सी बँकेचे उपाध्यक्ष गोरख बापू धुमाळ तेलगावचे सरपंच दीपक लगड आदी प्रगतशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. 

यावेळी शुभेच्छा देताना कल्याण कुलकर्णी म्हणाले की शेतकऱ्याचे खरे भले करण्याचे काम कॄषि दुकानदारच करू शकतो फक्त दुकानदाराने शेतकर्‍यांशी प्रामाणिक राहून व्यवसाय करावा आपल्याला जास्त नफा मिळतो म्हणून बोगस खत ,बियाने न विकता  शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दर्जेदार औषधे ,बियाणे, खते ठेवून शेतकऱ्यांची सेवा करावी .शेतकरी हा भोळा असून देवाप्रमाणे त्याचा दुकानदारावरती विश्वास असतो तो पूर्णपणे कृषी दुकानावरती अवलंबून असतो .म्हणून कृषी दुकानदाराने त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रमाणिकपणे काम केले तर शेतीमध्ये नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही .या वेळी राजेभाऊ धुमाळ यानी सर्वांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यूवराज लगड यांनी केले.

No comments