Breaking News

साहित्यीक डाँ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे उद्या होणार वितरण


पत्रकार महेंद्रकुमार मूधोळकर,प्रा.शेख सत्तार यांचा मुकनायक पुरस्काराने तर

माजलगाव भूषण पुरस्काराने बाबुराव पोटभरे,डॉ.जी.आर.देशपांडे, चंद्रकांत शेजुळ यांचा होणार सन्मान

माजलगाव :  महराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुकनायक दिनानिमित्त मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार गेल्या वर्षांपासून देण्यात येत असुन या वर्षिचा मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हास्ते व मराठवाडा शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष भाई गंगाभिषण थावरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि ०२ फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी ११:३० वाजता होणार आहे, या कार्यक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद पठाण,उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे, सचिव बाळासाहेब आडागळे यांनी केले आहे.

 महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतिने प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी उद्या दि ०२ फेब्रुवारी मंगळवार रोजी मुकनायक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, मुकनायक दिनाचे औचित्य साधुन पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना मुकनायक पुरस्कार देण्यात योत आसतो यावर्षीचा मुकनायक पुरस्कार   बिड येथील टि.व्हि.९ मराठीचे निर्भीड पत्रकार महेंद्रकुमार मुधोळकर व सा.माजलगाव पत्रिकाचे संपादक प्रा.शेख सत्तार यांना जाहिर करण्यात आले आहेत तर माजलगाव येथील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्याक्तीनां माजलगाव भुषण पुरस्कार देण्यात येत आसतो यावर्षिचा माजलगाव भुषण पुरस्कार बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे ( सामाजिक ) प्रसिद्ध डाँ.जि.आर.देशपांडे ( रुग्णसेवा ) व तुळजाभवानी आर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ ( सहकार ) यांना जाहीर करण्यात आला असुन या पुरस्काराचे वितरण उद्या दि ०२ फेब्रुवारी मंगळवार रोजी  सकाळी ११:३० वाजता येथील राजस्थानी मंगल कार्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व मराठवाडा शेतकरी संघर्ष समीतीचे संस्थापक अध्यक्ष भाई गंगाभिषण थावरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर प्रमुख वक्ते म्हणून लोकपत्रकार भागवत तावरे असणार आहेत.

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.अँड.उषाताई दराडे,सुशीलाताई मोराळे,एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष शफीकभाऊ, मुंबई बाजार समितीचे सभापती आशोक डक,नगरध्याक्ष शेख मंजुर, भाजपा नेते रमेशराव आडसकर, छत्रपती कारखान्याचे व्हाँईस चेअरमन मोहनराव जगताप, जि.प.चे बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, माजलगाव बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ, पंचायत समिती सभापती सौ.सोनालीताई खुळे,उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, तहसीलदार वैशाली पाटील, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमास माजलगाव शहरातील व ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद खाँ पठाण,उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे, सचिव बाळासाहेब आडागळे,आमर साळवे,हामिद शेख व संतोष रासवे यांनी केले आहे.

No comments