Breaking News

आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर, वीज कनेक्शन तात्काळ जोडा :-राजेंद्र आमटे


व्यापाऱ्याकडे लाखो रुपये थकीत, कार्यवाही फक्त शेतकार्यावरच का?  
बीड :  शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मिरवणारे आघाडी सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे. शेतकरी करोना महामारी मुळे बेचिराख झाला आसताना शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी शेतकऱ्याच्या शेतातील वीज पुरवठा बंद करून पीक पाण्याअभावी जाळण्याचा घाट आघाडी सरकार व महावितरणने घातला आहे.

       लाखो -रुपयचे व्यापारी चे थकीत असताना एकही अधिकारी व्यापारी ,उधोजक यांचे वीज कनेक्शन बंद करत नाही आणि आघाडी सरकार व महावितरण फक्त शेतकऱ्याचे वीज कनेक्शन बंद करण्यात दंग आहेत? मोठ-मोठ्या धनाढ्य व्यापाऱ्यांचे तळवे चालणारे सरकार शेतकऱ्याच्या मुळावर का?
       शेतकऱ्याच्या शेतातील पीक पाण्याअभावी जळतील, थोडे -फार पाणी आहे या पाण्यावर शेतकऱ्याला पीक घेऊ ध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मुख्यपिक कापूस बेचिराख झाले आहे आता थोड्याफार पाण्यावर भाजीपाला,इतर पीक शेतकरी घेत असताना महावितरण व सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे 
     तात्काळ शेतकारायचे विधुत कनेक्शन जोडून शेतकऱ्याचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा शिवसंग्राम शेतकऱ्यांनसाठी तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसंग्रामचे  राजेंद्र आमटे,प्रशांत डोरले,बाबू सुरवसे,सौरभ तांबे,हरीश शिंदे,संतोष भोसले, विलास सिरसाट,गणेश अडसूळ,दत्ता केजभट, अजित दासांते, विलास मस्के,आदींच्या वतीने इशारा देण्यात येत आहे.
No comments