Breaking News

टायगर ग्रुपची बीडमध्ये एन्ट्री..!


सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश 

बीड : महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात उंच भरारी घेत सामान्यांच्या जीवनातील अडीअडचणीला सदैव मदत करणारे पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या टायगर ग्रुपची बीडमध्ये इन्ट्री होत असून बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा दि. 20 फेब्रुवारी रोजी करमाळा येथे तानाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. अनेक बेरोजगार तरूणांना टायरगु्रपच्या माध्यमातून रोजगार मिळून देण्याचे कार्य तानाजीभाऊंनी मोठ्या तळमळीने केले असून या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे अविनाश जाधव यांनी ठरवले आहे.

No comments