Breaking News

बीडमध्ये उद्या पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंचा जनता दरबार.. दर महिन्याला होणार जनता दरबाराचे अयोजन


बीड  :
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवार (दि. ०५) रोजी दुपारी २.३० वा.पासून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, बार्शी रोड, बीड येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत जिल्हा वासीयांना भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या जनता दरबार उपक्रमास मुंबई येथील पक्ष कार्यालयात दर गुरुवारी धनंजय मुंडे हे उपस्थित असतात. या ठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांचे प्रश्न / समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. धकनंजय मुंडे हे मुंबई व्यतिरिक्त परळी व बीड मध्येही नेहमी जनता दरबार उपक्रम आयोजित करून लोकांच्या भेटीसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असतात. जागच्या जागीच प्रश्न निकाली काढणे हे मुंडेंच्या जनता दरबाराचे वैशिष्ट्य मानले जाते.

खा. पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दर महिन्यातून किमान एकदा जनता दरबार आयोजित करावा अशा सूचना नुकत्याच दिल्या होत्या. त्यानुसार धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस भवन, बीड येथे दि. ५ फेब्रुवारी, शुक्रवारी दुपारी २.३० वाजलेपासून जनता दरबार आयोजित करण्यात आला असून, हा उपक्रम आता दर महिन्याला राबविण्यात येईल; तसेच यावेळी भेटायला येणाऱ्या नागरिकांनी कोविडविषयक नियमांचे पालन करून भेट घ्यावी असे आवाहन ना. मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments