Breaking News

सतत आरोग्य तपासणी ही काळाची गरज : डॉ. राहुल टेकाडे


आष्टी :   
पूर्वी आरोग्य तपासणीच्या फारशा सुविधा नव्हत्या,आता विविध तपासण्याच्या  सुविधा झालेल्या आहेत.काही आजार नेहमीच डोके वर काढतात.काही आजारावर आपण सातत्याने उपचार केला तर, त्यांना आपल्या शरीरापासून,व्याधी म्हणून दूर ठेवता येते.परंतु आपण त्यासाठी सतत आरोग्याची तपासणी केल पाहिजे.कोव्हिडिच्या निमित्ताने रक्तदाब,मधुमेह या सारखे व्याधी आज स्वतःहून माणूस तपासून घेतो आहे. 

हंबर्डे महाविद्यालय कर्मचारी, अन्य गरजवंतांनासाठी वेगवेगळ्या तपासणी शिबिरांचे आयोजन करतात,अनेक उपक्रम या माध्यमातून ते राबवतात. त्यांचे मी कौतुक करतो.असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे म्हणाले.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे म्हणाले, ग्रामीण रुग्णालय तथा ट्रामा केअर सेंटर आष्टी, यांचे आम्हाला शिबिराच्या बाबतीत नेहमीच योगदान लाभते.डॉ गणेश पिसाळ यांनीही यावेळी यथोचित मार्गदर्शन केले. 

शिबिरात 100  प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यातआल्या.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली एडवोकेट बी.डी हंबर्डे महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.डॉ.गणेश पिसाळ, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील डॉ.  अमित डोके, पथकातील रूपाली राऊत, जयचंद नेलवाडे, नागेश करांडे,धर्मे,  खरमाडे,सुजाता दहिफळे,शुभांगी चौधरी,परिचारिका पथका या शिबिरासाठी योगदान दिले.प्रास्ताविक डॉ.सुहास गोपने यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी केले.आभार डॉ.सखाराम वांढरे यांनी मानले.

No comments