Breaking News

समाज कल्याणचे साहाय्यक आयुक्त मडावी यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ : वंचितचे अजय सरवदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

"दया कुछ तो गडबड है"... पत्ता लगाओ..!

बीड : जिल्ह्यात कायम कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांचा वणवा पाहायला मिळतो. त्यामुळेच की, बीडच्या समाजकल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामे व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यानंतर दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असून सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या टेबलावर  गेल्या ६० दिवसांपासून सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व इतर कर्मचारी यांचे निलंबन करण्याची फाईल आहे. मात्र त्यावर कारवाई केली जात नसल्याने दया कुछ तो गडबड है...पत्ता लगाओ..! असे बॅनर लावून वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर सोमवारी (दि.१५)  उपोषणास बसले आहेत.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बीडच्या समाजकल्याण मध्ये मागासवर्गीय गोरगरिबांच्या योजनेमध्ये नियमबाह्य कामे व भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. या भ्रष्टाचारात समाजकल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व इतर कर्मचारी यांचे हात बरबटलेले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर त्यात ते दोषी आढळून आले आहेत. प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व इतर कर्मचारी यांना निलंबित करण्यासाठी प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या टेबलावर गेल्या ६० दिवसांपासून पडून आहे. मात्र कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वंचितचे कार्यकर्ते अजय सरवदे यांनी केला आहे. 

बीड जिल्ह्यात कर्तव्य अधिकाऱ्यांचा वणवा असल्याने मुजोर अधिकाऱ्यांना बीड जिल्हा कुरण वाटतोय. आशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा कोण प्रयत्न करतय. यासाठी सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युमन यांचा फेमस डायलॉग असलेला दया कुछ तो गडबड है, पत्ता लगाओ असे बॅनर लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे अजय सरवदे, रवी वाघमारे, खंडू जाधव, संतोष जोगदंड, राजेंद्र कोरडे, ज्ञानेश्वर कवठेकर, लखन जोगदंड, विवेक मस्के, मिलिंद सरपते, शेख युनूस भाई, किशोर भोले, आदी उपोषणास बसले आहेत.

No comments