Breaking News

सीएम साहेब, डोळे उघडा, आंदोलनस्थळी या...

अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या 13 व्या दिवशी शिक्षक आक्रमक...

आ.विनायकराव मेटेंची शिक्षक आंदोलनावरुन ठाकरे सरकारवर टिका...

महिला शिक्षकांचा मुंडण करण्याचा इशारा....


बीड :   राज्यातील अंशत: अनुदानीतविनाअनुदानीत शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलेले आहे. गेल्या 13 दिवसांपासून सूरू असूनही राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत अनुदानाचा निर्णय न झाल्यास सरकारचा निषेध म्हणून मुंडण करण्याचा ईशारा महिला शिक्षिकांनी दिला आहे. दरम्यान आज दुपारी शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून राज्यसरकारवर कडक शब्दात टिका केली. शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ यावी ही बाब राज्यसरकारच्या दृष्टीने अतिशय गंभीर असुन, 13 दिवसांपासुन बसलेल्या शिक्षकांकडे पहायला सरकारला वेळ नसल्याचा आरोप आ.विनायकराव मेटे यांनी केला. सीएम साहेबांनी आता तरी डोळे उघडावेत आणि आंदोलनस्थळी यावे असेही आ.विनायकराव मेटे यांनी सांगितले.

 

राज्यभरातील अंशत: अनुदानीत आणि विनाअनुदानीत शाळांना 100% अनुदान द्या अशी आग्रही मागणीसह दिनांक 13/09/2019 च्या अनुदान मंजुर 20% व वाढील 40% वेतनाचा निधी वितरण आदेश तात्काळ काढावा तसेच मेडिक्लेम व सेवा शर्ती लागू करण्याबाबतची मागणी शिक्षकांमधुन होत आहे. राज्यसरकारला यापुर्वी वारंवार अर्जविनंत्या करूनही त्यांनी दखल घेतली नाही. उलट दिनांक 14/10/2020 च्या कॅबिनेटने तपासून घोषीत केलेले शाळाकॉलेजे्स तपासणी लावून तब्बल एक वर्ष बिनपगारी शिक्षकांना झुलवत ठेवलेले आहे.  त्यामुळे दिनांक 29 जानेवारीपासुन मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. बीडसह प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले असुन 13 दिवसांपासुन आंदोलन सुरु असुनहीं सरकार दखल घेत नसल्याने शिक्षक आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेतली. निषेध म्हणून सरकारचा 13 वा घालुन बोंबा ठोकण्यात आल्या. यावेळी आ.विनायक मेटे यांनी आंदोलकांची भेट घेवून राज्य सरकारवर टिका केली आहे.

No comments