Breaking News

संत गाडगेबाबाची जयंती पिंपळा येथे साजरी

 

आष्टी :  तालुक्यातील पिंपळा येथे संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्या आधी पिंपळागावचे ग्रामदैवत पिंपळेश्वर महाराज व सय्यद हुसेन महाराज तसेच बाजार तळ प्राथमिक शाळा या ठिकाणी स्वच्छता करून बौद्ध विहार येथे गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संत गाडगेबाबा हे मराठी संत व समाज सुधारक होते 23 फेब्रुवारी 1876 ला अमरावती जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते.चिंध्यांची गोधडी हे त्यांचे महावस्त्र होते त्यांच्या हातात गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून ओळखत.समाज्यात असलेल्या अज्ञानी व अंधश्रद्धा पाहून त्यांना स्वीकारले समाजात सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी कीर्तनाचे माध्यम वापरले.ते गावोगावी फिरले वो कीर्तनाच्या माध्यमातून लोक जागृती केली गावोगावी फिरताना हाताच्या खराट्याने गावचे रस्ते झाडले.


कीर्तनातील त्यांचे उपदेश सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील असेच होते माणसाने स्वच्छता राखावी.चोरी करू नये,दारू पिऊ नये,असे उपदेश आपल्या कीर्तनात येत असेल ते आपल्या कीर्तनातून देत असत महाराष्ट्रातील अनेक धर्मस्थळाच्या ठिकाणी यात्रे करूनचे हाल होते म्हणून त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या अपंगांसाठी त्यांनी अनेक कार्य केले,यावेळी  कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या युवा मित्र.युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष.मा.युवराज खटके,ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी,मा,आरू साहेब, प्रा,दादा विधाते सर,युवा नेते,संदिप लिंबोरे,राजेंद्र गाढवे महाराज,नामदेव आरुण,पोपट पवार,मेहेत्रे सुभाष,आरूण मसु सर,प्रशांत मेहेत्रे,बाबासाहेब दिंडे,मधुकर शिंदे,व बौद्ध विहार येथील अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थ पिंपळा हे उपस्थित होते.

No comments