Breaking News

शिवरायांचे विचार आचरणात आणा डॉ.महादेव मुंडे यांचे प्रतिपादन; खडकीत शिवजयंती उत्साहात

वडवणी  ः  छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या युद्धकौशल्य आणि उत्कृष्ट राज्य कारभारातून आदर्श निर्माण केला. बलाढ्य अशा शत्रुला पराजित करत प्रजेच्या कल्याणाची कामे केली. त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत असे प्रतिपादन डॉ.महादेव मुंडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खडकी येथे आयोजीत कार्यक्रमात डॉ.महादेव मुंडे बोलत होते. प्रारंभी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जयंती समितीच्या वतीने सैन्य दलात नुकतेच भरती झालेले जवान रामप्रसाद भारत करांडे व सामाजिक कार्यकर्ते डॉ.महादेव मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलतांना डॉ.मुंडे म्हणाले.

छत्रपती शिवाजी राजेंनी शेतीसाठी व प्रजेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. यातून त्यांची दुरदृष्टी दिसून येते. कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्यांनी राज्यावर आलेले आक्रमण परतवून लावले. आपण त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. गावचा विकास साध्य करायचा असेल तर राजकारण केवळ निवडणूकांपुरतेच मर्यादित ठेवायला हवे. इतर वेळी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. खडकी गाव वडवणीत आदर्श करण्यासाठी आम्ही लागेल ती मदत करु असे आश्‍वासन डॉ.महादेव मुंडे यांनी दिले.
यावेळी गोविंद दराडे, नितीन चोले, ज्ञानेश्वरी  दराडे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. धर्मराज करांडे, गोवर्धन दराडे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गोरख दराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक करांडे यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments