Breaking News

केजच्या लेंडी नदीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

गौतम बचुटे । केज  

येथील अल्लाउद्दीन नगरच्या जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या  कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी केज येथील भिमनगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रात एक पुरुष जातीचे अंदाजे ४५ वर्ष वयाचे अनोळखी प्रेत पालथ्या अवस्थेत तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शेख युन्नूस चांद व गुलाब गुंड हे दुपारी ४:०० वा. च्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना  नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यात तरंगाताना आढळून आला. त्यांनी याची माहिती केज पोलीस स्टेशनला देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय-बाईक विभागाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे सर्वजण घटनास्थळावर हजर झाले. प्रेत पाण्याच्या बाहेर काढन्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याची अधिक माहिती व तपास पोलीस करीत आहेत. सदर घटना ही घातपात की अपघात असल्याचीही शंका व्यक्त होत असून यामुळे खळबळ माजली आहे.


No comments