Breaking News

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू


माजलगाव :
विद्युत मोटारीची पीन लावत असताना अचानक विजेचा शॉक लागून एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माजलागाव तालुक्यातील हिवरा (बु.) येथे मंगळवारी (दि.२३) दुपारी १२ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील हिवरा (बु.) येथील अरविंद आर्जुनराव डावरे (वय २५) हा तरुण आपल्या घरातील विद्युत मोटार चालु करण्यासाठी विद्युत प्रवाहाची पिन लावत असताना अचानक अाल्याने विद्युत प्रवाह‍चा तिव्र झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह  आणण्यात आला होता. अरविंद आर्जुनराव डावरे या तरुणाच्या पश्चात पत्नि, आई -वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

No comments