Breaking News

नवगण कॉलेज रोड ते पंचशील नगर मार्गे पालवण चौका कडे जाणाऱ्या रस्त्याची लागली वाट : नगराध्यक्ष साहेब लक्ष देणार का- ॲड.सदानंद वाघमारे

बीड :  गेल्या काही दिवसांपासून बीड शहरातील अनेक रस्ते नाल्या या पावसाळ्या सारख्या तुडुंब भरून वाहत असल्याचा आरोप ॲड.सदानंद वाघमारे यांनी केला. नवगण कॉलेज रोड ते पंचशील नगर मार्गे पालवण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या भागातील नगरसेवक तसेच स्वच्छता विभागाचे सभापती हे दुर्लक्ष करत असल्यामुळे या भागातील नागरिकांची अवस्था ही बिकट झालेली आहे. लोकप्रतिनिधींना या भागातील जनतेने सार्वजनिक सुखसोयी उपलब्ध करून देतील या आशेवर निवडून दिले होते.परंतु त्यांनी जनतेची दिशाभूल करून त्यांना रस्ते नाली तसेच कचरा या पासून त्यांची मुक्तता केलेली दिसून येते. 

अनेक वेळा रस्त्याचे उद्घाटन करून ही आहे तीच परिस्थिती सध्या शहरांमध्ये दिसून येत आहे. काही दिवसातच नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने अनेक भागात रस्ता व नाली च्या उद्घाटनाची जोरदार तयारी चालू असताना दिसून येत आहे. बीड शहरातील जनतेने आपण दिलेला उमेदवार लोकप्रतिनिधी कितपत यशस्वी झाला हे पाहूनच येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे होऊन जनतेला रस्ते नाली स्वच्छ पाणी याची पूर्तता करावी अन्यथा येणाऱ्या काळात जनता लोकप्रतिनिधींना माफ करणार नाही याची बीड नगर अध्यक्ष साहेब यांनी गांभीर्याने दखल घेऊन बीड शहरात होत असलेल्या कासव गतीच्या कामांना गती द्यावी असे सामान्य नागरिकांतून मागणी होत असल्याचे यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ॲड.सदानंद वाघमारे यांनी कळवले आहे.


No comments