Breaking News

शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज-जिल्हाधिकारी जगताप

बीड : शाळाबाह्य सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. दिनांक 1 मार्च ते 10 मार्च 2021 दरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांची शोधमोहिम यशस्वी करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शोध मोहिमेत सर्व संबंधित घटकांनी सहभागी व्हावे आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.विक्रम सारुक, यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले, शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी बालरक्षक,    सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचायर्र् आदी सर्व घटकांनी सामुहिक प्रयत्न करावेत. यासंदर्भात कृती कार्यक्रम तयार करून यशस्वीपणे राबविण्यात यावा. सर्व संबंधितांना लेखी सूचना देवून यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यावेळी दिले.प्रारंभी समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळाबाह्य विद्याथ्यार्ंच्या शोध मोहिमेचा उद्देश आणि कार्यवाहीबाबत सविस्तर विवेचन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, अधिव्याख्याता कापसे, यांच्यासह इत्तर समिती सदस्य उपस्थित होते. 
No comments