Breaking News

आष्टी तालुक्यातील बस सेवा तात्काळ सुरळीत करा आ. बाळासाहेब आजबे यांची आगार प्रमुखांना सूचना

आष्टी : गेल्या दहा महिन्यापासून कोरोनामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प  होती. परंतु शासनाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाळेमध्ये घेण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच तालुका स्तरावरील सर्वच शासकीय कार्यालये पूर्णपणे चालू झाले असून गग्रामीण भागातील नागरिक प्रशासकीय कामानिमित्त शहराच्या ठिकाणी येण्यास अडचणी निर्माण होत आहेत यामुळे आष्टी तालुक्यातील बससेवा सुरळीत सुरू करून केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश आ. बाळासाहेब आजबे यांनी आष्टीचे आगार प्रमुख संतोष डोके यांना दिले आहे. 

                  आष्टी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिक आष्टी शहरांमध्ये विविध कामांसाठी येत असतात. सध्या कोरोना नियमाच्या अधीन राहून शासनाने पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा व शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामीण भागातील बससेवा पुर्णपणे ठप्प असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्याल, शाळेमध्ये व नागरिकांना शहरात येण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येताच आमदार बाळासाहेब आजबे यांनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरु करुन शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची होणारी गैरसोय थांबवून तालुक्यातील सर्वच बस सेवा सुरळीत करून तात्काळ चालू करण्याचे आदेश आष्टीचे आगार प्रमुख संतोष डोके यांना दिले आहे.

           यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे,कर्तव्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप भाऊ सुंबरे, सरपंच राम उदमले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नाजीम शेख, सरपंच अशोक पोकळे,भाऊसाहेब घुले,डॉ अशोक सरोदे,येदु करडुळे,दिलीप चव्हाण,राम गोंदकर,सुधीर जगताप,इकबाल तांबोळी,आरिफ भाई,अमोल सरोदे हनुमंत पवार,संदीप जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.

No comments