Breaking News

आर्वी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकास कामाचे शिवसंग्रामचे नेते रामहरी भैय्या मेटे यांच्या हस्ते भूमिपूजन


बीड  : आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आर्वी ता.शिरुर (का.) येथे शिवसंग्रमाचे नेते रामहरी भैय्या मेटे यांच्या हस्ते  करण्यात आले.
भूमिपूजनानंतर प्रमुख कार्यक्रमास संबोधीत करताना रामहरी भैय्या मेटे यांनी गाव पातळीवर विकासाचे राजकारण व समाजकारण होणे गरजेचे असून, या योजनेअंतर्गत  साकरणाऱ्या रस्त्याचे काम उच्च प्रतीचे करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. आर्वी येथील ग्रामस्थांनी त्यांचे भव्य स्वागत केले व अनेक विकास कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी त्यांनी भविष्यात आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे या भागात  करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी शिवसंग्रामचे नेते अनिल घुमरे, सरपंच शहाजी भोसले, उपसरपंच नंदकुमार भोकरे, अर्जुन पवळ, नामदेव धांडे, नाथा तांबारे, कृष्णा परजने, अशोक भोकरे, बप्पासाहेब जाधव, संतोष लोनके, दत्ता पवळ, गंगा भोसले, सुरेश मंडलीक, दत्ता इंगळे, सुसकर सर, शैलेश सुरवसे आदी. पदाधिकारी व कार्यक्रर्ते उपस्थित होते.
No comments