Breaking News

गावातील प्रत्येक माणसाचं उत्पन्न दुप्पट करणारा विकास घडवणार--पालकमंत्री धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडें यांनी नाथ्रा येथे केले, दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण

४ कोटीं ८९ लाख ९९ हजार रुपयांच्या विकास कामांचे झाले भूमिपूजन

गावकर्‍यांनी आपल्या भूमिपूत्राचा केला भव्य नागरी सत्कार

बीड/परळी : गावात फक्त रस्ते, नाल्या, बंधारे बांधणे हाच फक्त विकास नसून नाथ्रा गावातील प्रत्येक माणसाचं उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही आणि तोच माझ्या दृष्टीने खरा विकास आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.


परळी तालुक्यातील नाथ्रा या आपल्या जन्म गावात   पांढरी उच्छालक बंधारासह विविध कामांचे  लोकार्पण आणि नवीन विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नाथ्रा ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य सत्कारास उत्तर देताना पालकमंत्री श्री मुंडे बोलत होते. या कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या सिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे,  सदस्या सुषमाताई मुंडे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, गोविंद  फड आणि मोठ्या संख्येने महिला, जेष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पालक मंत्री धनंजय मुंडे म्हणाले , माझा नाथ्रा गावात जन्म झाला असून याचे अनेक ऋण आहेत ते अनेक जन्म आपल्यावर असेच रहावे,  असे भावोद् गार श्री. मुंडे यांनी याप्रसंगी काढले.  ते म्हणाले,  गावकऱ्यांनी जो विचार केला नाही तो विकास येणाऱ्या चार वर्षात करून दाखवणार आहे.  तर गावाचं नाव राज्यात केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पालकमंत्री श्री मुंडे यांनी व्यक्त केला. 

पाण्याची उपलब्धता वाढत असून ऊस उत्पादन वाढू लागले आहे. येणाऱ्या वर्षी मुंगी येथील शिवपार्वती कारखाना उस गाळप हंगाम सुरू करण्यात येईल. असे सांगितले,  त्यांनी यावेळी गावातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.  पालकमंत्री यांच्या उपस्थितीत या गावातील कार्यक्रम आधी विविध ठिकाणी कार्यक्रम असल्याने नाथरा येथे येण्यास त्यांना उशीर झाला. तरीही नागरिक, ग्रामस्थ व विशेषतः महिला प्रचंड मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे दिसून येत होते.

पालकमंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते या १० कामांचे झाले लोकार्पण

पांढरी येथील उच्चालक बंधारा 1.25 कोटी रुपये, वार्ड क्रमांक 1 मधील रस्ता व नाली 30 लक्ष रुपये, स्मशानभूमी कम्पाऊंड 20 लक्ष रुपये, स्वर्गीय पंडितांना मुंडे प्रवासी निवारा दहा लक्ष रुपये, सार्वजनिक वाचनालय दहा लक्ष रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंपाऊंड पंधरा लक्ष रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक पेवर ब्लॉक पाच लक्ष रुपये, अंगणवाडी एक पेवर ब्लॉक 5 लक्ष रुपये, अंगणवाडी दोन पेवर ब्लॉक पाच लक्ष रुपये, पशु वैद्यकीय दवाखाना पेवर ब्लॉक पाच लक्ष रुपये या पूर्ण झालेल्या कामांचे आज लोकार्पण करण्यात आले.

नवीन ७  विकास कामांचे झाले भूमिपूजन

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाथ्रा येथील बंधारा 1.25 कोटी रुपये, देशमुख टाकळी येथील बंधारा 1.25 कोटी रुपये, नाथरा प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती करण 1.50  कोटी रुपये, पापनासेश्वर सभाग्रह 40 लक्ष रुपये, वार्ड क्रमांक दोन मधील रस्ता व नाली 30 लक्ष रुपये, स्मशानभूमी येथील पेवर ब्लॉक पाच लक्ष रुपये, गावा अंतर्गत हाय मास्ट ९ लक्ष ९९ हजार रुपये, ओपन जिम पाच लक्ष रुपये या एकूण ४ कोटीं ८९ लाख ९९ हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 


No comments