Breaking News

सध्या देशात अघोषित आणीबाणी, पत्रकारांनी सरकारवर दबाव टाकणारी पत्रकारिता करावी - माजी आमदार उषाताई दराडे

मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे विवीध मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण

माजलगाव :    सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरु असुन आजच्या पत्रकारांनी सरकारवर दबाव टाकणारी पत्रकारिता पत्रकारांनी कारावी असे   मत माजी आमदार उषाताई दराडे यांनी माजलगाव येथील मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

येथील राजस्थानी मंगल कार्यालयात मुकनायक दिनानिमित्त मुकनायक पुरस्कार व माजलगाव भुषण पुरस्काराचे दि ०२ फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी १२:३० वाजता वितरण करण्यात आले, यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी भाई गंगाभिषण थावरे होते, तर प्रमुख पाहुणे साहित्यिक व कवी देविदास फुलारी,एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष अँड शफीकभाऊ,दिंगाबर कदम,यांची उपस्थिती होती,यावेळी मुकनायक पुरस्काराने टि.व्ही.९ मराठीचे जिल्हाप्रतिनीधी महेंद्रकुमार मुधोळकर व माजलगाव पत्रीकेचे संपादक प्रा.अब्दुल सत्तार यांना तर माजलगाव भुषण पुरस्काराने बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे ( सामाजिक ),डॉ. जि.आर.देशपांडे ( रुग्ण सेवा ) व तुळजाभवानी आर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ ( सहकार ) यांना विवीध मान्यावरांच्या उपस्थीतीत थाटात पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी पुढे बोलताना माजी आमदार उषाताई दराडे बोलताना म्हणाल्या की सध्या देशातील परस्थिती अत्यंत बिकट असुन एकप्रकारे देशात अघोषित आणीबाणी असुन पत्रकारांनी या अघोषित आणीबाणी विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकणारी पत्रकारिता करावी असे मत व्यक्त केले. यावेळी साहित्यिक देवीदास फुलारी,भाई भाई गंगाभिषण थावरे,अँड शफीकभाऊ भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.संजय बागुल सर यांनी केले त प्रस्ताविक महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद पठाण यांनी केले,कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्र पत्रकार संघाचे उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे यांनी केले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सचिव बाळासाहेब आडागळे, सदस्य अँड आमर साळवे,संतोष रासवे व हामिद शेख यांनी परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेबांच्या मुकनायकाचा कार्यक्रमास अनु-उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधीनां महागत पडेल - बाबुराव पोटभरे

माजलगाव भुषण पुरस्कारास उत्तर देतांना  बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे म्हणाले कि लोकांनी निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक कार्यक्रमाला अनु-उपस्थित राहतात,त्या लोकप्रतिनीधील महागातच पडेल असा खोचक इशारा बाबुराव पोटभरे यांनी दिला.

No comments