Breaking News

केज येथे हायवा टिप्परने दोन विजेचे खांब तुटले : अधिकारी कार्यावाही करण्यास धजेना !

गौतम बचुटे । केज 

केज येथील भवानी माळावर एका हायवा टिप्परच्या धडकेत दोन ११ केव्ही विजेचे खांब तुटून नुकसान झाले. तरी मात्र अधिकाऱ्यांनी याची अद्याप पर्यंत रितसर तक्रार दाखल केली नसल्याची कळते आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि.३ फेब्रुवारी, बुधवार रोजी दुपारी १२ ०० ते १२:३० वा. च्या दरम्यान एका हायवा टिप्परच्या चालकाने बेजबाबदारपणे त्याच्या ताब्यातील वाहन चालवून ११ के. व्ही. च्या वीज वाहक खांबाला धडक दिली. त्यामुळे विजेचे दोन खांब मोडून सहा खांबाच्या अंतरात वीज वाहक तारा खाली पडल्या. तसेच एक व्ही क्रॉस तुटला. त्यामुळे कृषि पंपाचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे व वीज वितरण कंपनीचे नुकसान झालेले आहे. मात्र या घटनेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊन सुद्धा विज वितरण कंपनीने यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. यामुळे हे प्रकरण आपसात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करून रफादफा करून मिटविण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील असलकायाची  निर्माण होत आहे.

विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनचे वावडे का ?

ग्राहकांनी त्यांच्या समस्या किंवा अडचणी सोडविण्यासाठी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करून सार्वजनिक केले आहेत. परंतु अधिकारी कधीच कॉल स्विकारीत नाहीत. तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचेही फोन स्विकारीत नाहीत. म्हणून अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हायलाच हवी. अशी मागणी ग्राहकातून होत आहे.

 "सदर घटनेचे फोटो सोशल मीडियावर आले परंतु यातील वाहनांची माहिती एम परिवहन संकेतस्थळा मिळत नसल्याने कार्यकाही करता येत नाही." असे कनिष्ट अभियंता रामेकर

No comments