Breaking News

माजलगाव तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद

प्रतिकात्मक

- तहसिल आवारातुन पकडलेला हायवा दिला सोडुन

- जिल्हाधिकारी साहेब वाळुमाफियांना लक्ष घालुन आपणच आवर घाला

- ग्रामस्थांची मागणी

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

 माजलगाव तालुक्यामध्ये शासकीय वाळुचा घाट एकही निघालेला नसतांना स्थानिक महसुलचे अधिकारी यांच्या संगणमताने गेल्या अनेक दिवसांपासुन वाळूमाफियांनी उच्छाद मांडला आहे.  या संदर्भात अनेक तक्रारी करूनही वरिष्ठ याची गांभिर्याने दखल घेत नाहीत. अधिका-यांचे अभय असल्याने वाळूमाफिया ग्रामस्थांनाही दमदाटी करत आहेत म्हणुन जिल्हाधिकारी साहेब स्वतः आपणच वाळुमाफियांना आवर घाला अशी मागणी गोदाकाठ आणि सिंदफणा नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे. महसुल अधिकारी आणि वाळु माफिया यांचे संगणमत असल्याचा नमुना दि. 9 फेब्रुवारी रोजी आठ दिवसांपूर्वी पकडलेला हायवा चिरीमिरी घेउन रात्री सोडुन दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये महसुल आणि वाळूमाफियाच्या 'अर्थ' पूर्ण संबंधाची उलट सुलट चर्चा होत आहे. 

माजलगाव तालुक्यातील गोदावरी काठावरील मोगरा, डिग्रस, पोहनेर, तपे निमगाव, काळेगांव, सादोळा, सांडस चिंचोली, देपेगांव आणि सिंदफणा नदी काठावरील गोविंदपुर, नागडगांव, माजलगाव आदी गावांमधुन महसुल अधिका-यांच्या संगणमताने रात्री बेरात्री जेसीबी घालुन बेकायदेेशीर वाळु उपस्याचा हैदोस वाळु माफियांनी घातला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अनेक लेखी, तोंडी तक्रारी दिल्या आहेत मात्र आम्ही महसुल अधिका-यांशी संगणमत केले आहे म्हणुन आमचे काहीही होउ शकत नाही असे म्हणत उलट ग्रामस्थांनाच दम देत आहेत परंतु जिल्हाधिकारी साहेब आपण स्वतःच लक्ष घालुन तालुक्यातील वाळुमाफिया व महसुलची वाढत असलेली मगरूरी थांबविण्याची मागणी नदीकाठच्या गावातुन होत आहे. वाळुमाफिया व महसुल अधिका-यांचे संगणमत असल्याचा नमुना दि. 9 फेब्रुवारी रोजी रात्री आठ दिवसांपूर्वी अधिका-यांनी पकडलेला हायवा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सोडुन दिला आहे. याप्रकारामध्ये कुणी चिरीमिरी घेतली व कुणी हा हायवा सोडला याची चैकशी होउन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांमधुन होत आहे.

No comments