Breaking News

सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईकांच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू


बीड :
भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या खाली कोसळून  झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील तिंतरवणी जवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. अपघातात मृत झालेले दोघेही व्यक्ती हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि  विलास तगडपल्लेवार हे दोघे पती पत्नी आपल्या मुलाला भेटण्यासाठी बुधवारी (दि.२४) पुसद येथून.स्वतः स्विफ्ट डिझायर क्र.एमएच-29 आर-4230 ने पुण्याला निघाले होते. मात्र त्यांची कार मातोरी-तिंतरवणी जवळ येताच पुलावरुन खाली कोसळली. यामुळे भीषण अपघात घडला.

ह्या भीषण अपघातात ममता व विलास तगडपल्लेवार या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

No comments