Breaking News

गारपिटीमुळे तोंडाशी आलेल्या रब्बी पिकाचे अतोनात नुकसान

दिंद्रुड : धारुर तालुक्यातील चिखली शिवारात बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकाचे अतोनात नुकसान झाल्याची घटना घडली आहे.


 

या गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोडाशी आलेला घास निसर्गाने हिसकवल्या चा प्रकार घडला आहे, चिखली,सुकळी,देवठाणा,फकिर जवळा, जैतापूर, मुंगी, कुंडी आदी गावातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले,बुधवार दि १७ रोजी सकाळ पासून कडक ऊन होते रात्री अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व ९ च्या दरम्यान बोराच्या आकाराच्या गाराचा वर्षाव सुरू झाला.

 


बुधवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट मुळे चिखली येथील शेतकरी संजय शेंडगे यांचे दोन एकर टरबूज पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरात अचानक झालेल्या गारपीट व वादळी पाऊसामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा,ज्वारी, हरबरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल विभागाने शेतांचा तात्‍काळ पंचनामा करत मदत मिळवून देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी व्यक्त केली आहे.या गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्या गेले आहे.
No comments