खरीप अनुदान लाटणाऱ्या तलाठ्यास निलंबित करा : उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्याकडे शेतकरी तुकाराम पवार यांची निवेदनाद्वारे मागणी
आष्टी : आष्टी तालुक्यातील मोराळा सज्याचे तत्कालीन तलाठी यांनी 2019- 2020 हंगामातील अनुदान ( 50796)पन्नास हजार सातशे शहानव रुपयेचे शासकीय अनुदान लाटर्णाऱ्या तलाठ्यास निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी तुकाराम पवार यांनी उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आष्टी तालुक्यातील मोराळा सज्याचे तत्कालीन तलाठी यांनी 2019- 2020 मध्ये खरीप हंगामातील शेतकऱ्यांना आलेले 50 हजार 796 रुपयांच्या शासकीय अनुदानामध्ये तलाठ्याने अफरातफर करून अनुदान लाटल्याची तक्रार शेतकरी तुकाराम पवार यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार आष्टी यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याचे शेतकरी पवार यांनी म्हटले असून मोराळा येथील तलाठी यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शासनाची फसवणूक करणाऱ्या मोराळा येथील तत्कालीन तलाठी यांना निलंबित करुन कार्यवाही करावी नसता उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी पवार यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी पाटोदा यांना दिला आहे.
No comments