Breaking News

प्रा.ज्ञानेश्वर नवले यांना मातृशोक


आष्टी :  आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील प्रा.ज्ञानेश्वर नवले यांच्या मातोश्री सुंदराबाई विश्वनाथ नवले यांचे आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले. 

त्या 95 वर्षाच्या होत्या. एक मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून त्यांची ख्याती होती. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.आष्टी येथील यश हॉटेल शेजारच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर आज पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.आपली मुलं शिकून मोठी व्हावीत असं त्यांना नेहमी वाटे. त्यांनी  हे  स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण केले. त्यांच्यामागे  चार मुले,एक मुलगी, सुना नातवंडे असा  मोठा परिवार आहे.

No comments