Breaking News

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले : प्रकाशराव कानगांवकर

ओबीसी बाराबलुतेदार, आठराआलुतेदार महासंघाच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन 

बीड : प्रत्येक महापुरुषांचे विचार आज स्वत:मध्ये उतरविण्याची गरज आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्व गाडगेबाबांनी समाजाला पटवून देतांना संत गाडगे बाबा एक लोक प्रबोधनाचा भाग होते असे प्रतिपादन ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत केले. ओबीसी बाराबलुतेदार, आठराआलुतेदार महासंघाच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना प्रकाशराव कानगावकर म्हणाले की, गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील अनेक रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छतेची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती असेही ते म्हणाले. 

या अभिवादन सभेला ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कानगावकर परीट समाजाचे गणेश जगताप, अ‍ॅड. सुधीर जाधव, मोहन राऊत, रमेश घोडके,कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे  साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू ताठे, भुई समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय घेणे, कोष्टी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश असलेेकर, , एसबीसी संघटनाचे जिल्हाध्यक्ष दगडू म्हेत्रे, लोहार समाजाचे अशोक आणेराव, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश कैवाडे, सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष बापुराव भालेकर, गोसावी परिषदेचे अध्यक्ष राजेंद बन, जगंम समाजाचे उमेश स्वामी, संतोष पवार, प्रवीण साळुंके, जिजा शिंदे, मंगेश घोडके, प्रा. विजय जाधव, अजय जाधव, रामेश्वर शिंदे, विक्रम वाघमारे, शंकर व्यवहारे, महादेव नरवडे, जीवन राऊत, प्रदीप वाघमारे, संतोष मुळे, अशोक राऊत, आदित्य रोकडे, विलास जाधव, भगवान भागवत यांच्यासह सह ओबीसी बारा बलुतेदार समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

No comments