Breaking News

स्कुटी मोटारसायकलच्या धडकेत एक ठार दोन गंभीर


माजलागाव शहरातील परभणी फाट्यावरील घटना

माजलगाव : स्कुटी मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक ठार तर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना शहरानजीक असणाऱ्या परभणी टी पॉईंट वर शुक्रवार दिनांक 5 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की पाथरी तालुक्यातील पुरा गावातील विजय महादेव पवने(वय 35 वर्षे)व किरण प्रकाश कुऱ्हाडे (वय 30 वर्षे) हे आपल्या स्कुटी वरून माजलगाव कडे येत होते.यावेळी वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील रहिवासी असलेले मयत गोरख पापा पवार (वय अंदाजे 40 वर्षे) यांच्या माजलगावा वरून बाहेर जाणाऱ्या पॅशन प्रो गाडीला धडकले. झालेल्या या अपघातात गोरख पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला असलेचे डाँक्टरान सांगितले आहे.

तर विजय पवने यांनाही मोठ्या  प्रमाणात इजा झाली आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 5 रोजी दुपारी दोन वाजता शहरापासून जवळच असलेल्या परभणी टी पॉइंटवर घडली आहे.दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात हलवले.जखमींची प्रकृती खालावली असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बीड कडे हलवण्यात येत आहे.


No comments