Breaking News

रायमोहात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू, तालुक्यात खळबळ!

शिरुर : - कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून नवीन रुग्णांची दररोज भर पडत आहे. रायमोह येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आज दिवसभर कोरोणाच्या तपासण्या चालू होत्या. यामध्ये दोन  व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील एका 55 वर्षीय रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची घटना येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी नऊ वाजता घडली. या घटनेने शिरुर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की   राज्यातील कोरणा बाधितांच्या संख्येमध्ये आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत असताना दिसून येत आहे दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित वाढत असून मग तुमचे प्रमाणे वाढत चाललेले आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे रायमोह येथील तपासणी केंद्रामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये दहापेक्षा जास्त लोक कोरोना बाधित निघाले असून आज  दि.21 फेब्रु.रविवारी सुद्धा दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी नऊ वाजता मृत व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मृत व्यक्तीचे प्रेत ग्रामीण रुग्णालयांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत होते आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पाच वाजेच्या नंतर कोरोना बाधित रुग्णाचे प्रेत कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.


No comments