Breaking News

तेलगावला कायमस्वरूपी तलाठी द्या ; बाळासाहेब सोनटक्के यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


  माजलगाव : धारुर तालुक्यातील तेलगाव येथे कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे नागरिकांचे कामे खोळंबली असुन कायमस्वरूपी तलाठी मिळावा यासाठी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे धारूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 

तेलगाव हे  ५०००.लोकसंख्या आसणारे धारूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून जमिनीचे झेञ मोठ्या प्रमाणात आहे. एक हजार कुटुंबाच्या तेलगावला मागील चार महिन्या पासुन कायमस्वरूपी तलाठी नाही त्यामुळे नागरिकांना अनेक आडचणीना तोंड द्यावे लागत आहे दुसर्‍या सज्जाच्या तलाठ्याकडे प्रभारी कारभार दिल्यामुळे तेलगाव ससंज्जातिल नागरिकांचे वेळेवर कामे होत नाहीत तेलगाव सज्जात चार गावे आहेत मात्र तलाठ्यावर दुसर्‍या सज्जाचा भार असल्यामुळे. तेलगाव सज्जातील नागरिकांना खुप अडचणी येत आहेत. 

शासनाचे शेतकऱ्यांसंबंधी असणारे कामे ऑनलाईन कामे सध्या पेंडिग पडले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी तलाठी मिळावा अशी मागणी अनेक नागरिकांची आहे. यासाठी कायमस्वरूपी तलाठी मिळावा याकरीता मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. चार दिवसात तेलगाव सज्जाला तलाठी मिळाला नाही तर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा सत्यशोधक ओबीसी परिषदेचे धारूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के.नवनाथ सोनटक्के व ईतर उपस्थित होते  यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे दिला आहे

No comments