Breaking News

त्या जातीयवादी गावगुंडावर अँट्राँसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा : अविनाश जोगदंड


जिरेवाडीतील दलित कुटुंबावरील  प्राणघातक  हल्ला प्रकरण 

बीड : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात मतदान केल्याचा राग मनात धरून दलित कुटूंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या जातीयवादी गावगुंडावर अँट्राँसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीय.

पत्रकात म्हटले आहे, की बीड शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी गावात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतच्या निवडणूका पार पडल्या होत्या. निवडणुकीत विरोधात मतदान केल्याचा राग मनात ठेवून जातीवादी मानसिकतेने पछाडलेलेल्या गावगुंडनी किराणा दुकानात कशाला आला. म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून संध्याकाळी गायकवाड कुंटूबावर प्राणघातक हल्ला केला. याघटनेची माहिती मिळताच रिपाइंचे बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पिडित कुंटूबाची भेट घेऊन धीर दिला. त्या हल्लेखोरांवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करून तत्काळ अटक करावी. तसेच याप्रकरणी अँट्राँसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा,  अशी मागणी रिपाइंचे बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी केली. यावेळी सनी जोगदंड यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते.





No comments