Breaking News

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बीडमध्ये चक्काजाम

बीड :  गत दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. आज देशभरामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनकर्त्यांना समर्थन देण्यासाठी बीडमध्येही संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध संघटनेतील पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांनी आज देशभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनकर्त्यांना समर्थन देण्यासाठी बीडमध्ये ही संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली विविध संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रा. सुशीलाताई मोराळे, राजकुमार घायाळ, मोहन जाधव, गणेश ढवळे, ऍड. आगे, करुणा टाकसाळ, संगमेश्वर आंधळकर, येडे, पंडित तुपे, जायभाये, गणेश मस्के, राजेश शिंदे, प्रा. पवार आदींची उपस्थिती होती.

No comments