Breaking News

क्या यहीं अच्छे दिन है यार?

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून युवा सेनेचा केंद्र सरकारला बॅनरमधून सवाल

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. काही दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती शंभरी पार करतील असं दिसतंय. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईत देखील मध्यरात्री जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्यात आले होते.

या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात 2015 साल आणि 2021 मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली गेली आहे.

 ज्यात मोठ्या प्रमाणात 2015 साल आणि 2021 सालच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये फरक असल्याचं म्हणत युवासेना कार्यकर्तांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाढत्या महागाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली जात असल्याचं वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पानवलकर यांनी स्पष्ट केलं आहे. आताच्या महागाईच्या अच्छे दिनपेक्षा आधीचे वाईट दिवसही चालतील म्हणत युवासेना कार्यकर्ते श्याम जैस्वाल यांनी केंद्राला टोला लगावला आहे.






No comments